महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट; पारा 40 अंशांवर जाणार, हवामान खात्याचा अलर्ट

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट; पारा 40 अंशांवर जाणार, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जानेसह अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. आता देशातील काही भागासाह राज्यातही उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात आता तापमानात मोठी वाढ होत असून आणखी आठवडाभर वातावरण आणखी तापण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात पुढील 24 तासांसाठी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात तापमानात प्रंचड वाढ झाली आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. तर वाढत्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पुढाल 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, रायगडसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोकण, ठाणे, मुंबई येथे तापमानाचा पार 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर जाणार आहे. मुंहई, कोकण, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;