‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.
सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.
सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे.
अतिशय हुशार, तल्लख आणि चालाख असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीने थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List