गोळीबारानंतर सलमान खानचे वडील कडाडले, सलिम खान थेट म्हणाले, अशा लोकांसोबत..

गोळीबारानंतर सलमान खानचे वडील कडाडले, सलिम खान थेट म्हणाले, अशा लोकांसोबत..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले. हेच नाही तर रविवारची सकाळ सलमान खान याच्या चाहत्यांसाठी हैराण करणारी ठरली. पहाटे 4.55 ला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खान याची बाल्कनी होती. हेच नाही तर एक गोळी सलमान खानच्या घरात देखील शिरली.

ईदच्या दिवशी ज्या बाल्कनीत उभे राहून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना सलमान खान दिसला, त्याच बाल्कनीवर गोळीबार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले होते. गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, 10 दिवसांची पोलिस कोठडी देखील यांना देण्यात आलीये.

आता या प्रकरणावर सलमान खान याचे वडील सलिम खान यांनी मोठे भाष्य केले आहे. सलिम खान यांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. यावेळी सलिम खान हे म्हणाले की, हे सर्व प्रकरण पोलिसांकडे आहे. या प्रकरणावर काही बोलण्यास किंवा यासंदर्भात मुलाखत देण्यास आम्हाला सध्या मनाई करण्यात आलीये. सलमान खान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये.
सलमान खान हा त्याचे काम करत आहे त्याला पूर्ण सुरक्षा पोलिसांची देण्यात आलीये.

पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी घेतलीये. पुढे सलिम खान नाव न घेता संतापत म्हणाले की, अशा मुर्ख लोकांसोबत काय बोलावले जे म्हणतात जीवे मारून टाकल्यानंतर समजेल. असा पागल माणूस आहे. पोलिसांनी सुरक्षेत वाढ केल्याचे सलिम खान यांनी देखील म्हटले आहे. सलिम खान हे ईदच्या दिवशी बाल्कनीत सलमान खान याच्यासोबत दिसले होते.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अनेक जण हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले. या गोळीबारावर सलमान खान याने काहीच भाष्य केले नाहीये. सलमान खानचे वडील सलिम खान आणि भाऊ अरबाज खान याच्यावर भाष्य करताना दिसले आहेत. आता हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणात काही मोठे खुलासे हे नक्कीच केले जाऊ शकतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;