कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 41 जनावरांची मिरजगावातून सुटका; पाचजणांना अटक

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 41 जनावरांची मिरजगावातून सुटका; पाचजणांना अटक

कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या 41 जनावरांची सुटका केली. त्याच वेळी 8 टन वजनाचे गोमांस घेऊन जाणारा आयशर टेम्पोसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री निंबोडी शिवार येथून एका आयशर टेम्पोमधून गोमांस व एका पिकअपमधून गोवंश जनावरे व वासरे कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिरजगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पथकासह निंबोडी शिवारातील एका शेतात जाऊन छापा टाकला.

इम्रान बाबा शेख, (वय 32, रा. बार्शी नाका, ख्वाजानगर, बीड), जमीर बशीर पठाण, (वय 54), योगेश रवींद्रसिंग परदेशी, (वय 45, रा. खडकपुरा गल्ली, करमाळा), मुसविर अजिज कुरेशी (वय 31), अल्फेश समीर कुरेशी (वय 17, दोघे रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) हे घटनास्थळी आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी गोमांसने भरलेला टेम्पो मिळून आला. तसेच या कामासाठी ते वापरत असलेल्या पाच मोटारसायकली व एक स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली. घटनास्थळापासून काही अंतरावर एक पिकअप वाहनामध्ये कत्तलीसाठी आणलेली एकूण 38 गोवंश जातीची वासरे आढळली. जवळच कत्तलीसाठी आणलेल्या एकूण 8 गायी मिळून आल्या आहेत. यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपींसोबत असणाऱ्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सतीश भताने, बबन दहिफळे, दीपक पवार, सुनील खैरे, गोकुळ पळसे, राजेंद्र गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन दहिफळे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;