पाण्याअभावी डाळिंब बागा जळाल्या; शेतकरी हवालदिल, माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई

पाण्याअभावी डाळिंब बागा जळाल्या; शेतकरी हवालदिल, माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई

माण तालुक्यातील मार्डी, मोही, पळशी माळीखोरा आदी परिसरात दरवर्षी डाळिंबाचे भरगच्च उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी शेकडो एकरांवर मोठय़ा प्रमाणात डाळिंबाची लागवड केली आहे. पण सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून, पाण्याअभावी डाळिंब बागा जळू लागल्या असून, या बागा जगविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे.

यावर्षी दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. पाऊस नसल्याने खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला. शेतातून कोणतेच पीक हाती लागले नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, मोठय़ा कष्टाने लागवड केलेल्या डाळिंब बागेसाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मार्डी, पळशी परिसरात शेकडो एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत. पण पाणी नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या डाळिंब बागा पाण्याअभावी जळून जात असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.

पारंपरिक पिकांना बगल देत आता अनेक शेतकरी फलोत्पादनाकडे वळले असल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने अनेक शेतकरी डाळिंब उत्पादनाला पसंती देत आहेत; पण यावर्षी परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात अनेक शेतकरी आर्थिक ओढाताण सहन करत हात उसने पैसे घेऊन विकतचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचनाद्वारे डाळिंब बागांना देत आहेत.

एका टँकरसाठी एक हजार रुपये
सध्या पाच हजार लिटरच्या लहान टँकरसाठी एक हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असून, या पाण्यावर कशीतरी पाचशे झाडे जगवता येत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून, पाणी कमी पडत असल्याने पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. डाळिंब जगवण्यासाठी पाणी विकत घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बागा जगवणे अवघड झाले आहे.

आता बँकांची कर्जे फेडायची कशी?
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून, परिसरातील तरुण नोकरीच्या मागे न लागता डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, सध्या पाणी नसल्याने बागा जळू लागल्या असून, आता बँकांची कर्जे फेडायची कशी, अशी चिंता तरुणांना भेडसावत आहे.

सध्या भीषण पाणीटंचाई भासत असून, विकत पाणी घेऊन बागा जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी.
– शिवाजी पोळ, शेतकरी, मार्डी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;