अॅग्युटचा 399 वा विजय
वृत्तसंस्था/ बार्सिलोना
सोमवारपासून येथे सुरु झालेल्या एटीपी टूरवरील बार्सिलोना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा अॅग्युटने विजयी सलामी देताना सैफुलीनचा पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील अॅग्युटचा हा 399 वा विजयी सामना आहे.
सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात अॅग्युटने सैफुलीनचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. हा सामना 2 तास चालला होता. 36 वर्षीय अॅग्युटने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील आतापर्यंत 12 स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात डॉमनिसियाच्या हार्डेथने मार्टिन लँडलुसीचा 2-6, 6-4, 6-3 तसेच अमेरिकेच्या नाकाशिमाने डॅनियल इव्हान्सचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List