आयएसएल उपांत्य सामने कोलकाता, मुंबईत
वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या फुटबॉल हंगामातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य फेरीचे सामने 28 आणि 29 एप्रिलला खेळविले जाणार आहेत. 28 एप्रिलचा पहिला उपांत्य सामना कोलकाता येथे तर 29 एप्रिलचा दुसरा सामना मुंबईत होणार आहे.
मोहन बागान संघाने पहिल्यांदा आयएसएल लीग शिल्ड फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पहिल्यांदाच जिंकताना मुंबई सिटी एफसीचा पराभव केला. मुंबई सिटी एफसी संघाला दुसरे स्थान मिळाले. दरम्यान हे दोन्ही संघ इंडियन सुपर लीगच्या दुसऱ्या फेरीतील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना 4 मे रोजी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List