बोस्टन मॅरेथॉन : लिमा, ओबीरी विजेते

वृत्तसंस्था/ बोस्टन

येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये सोमवारी इथोपियाच्या सिसे लिमाने पुरूष विभागातील तर केनियाच्या ओबिरीने महिला विभागातील जेतेपद पटकाविले.

सदर मॅरेथॉनवेळी स्पर्धकांना उष्णतेची समस्या चांगलीच जाणवली. इथोपियाच्या 34 वर्षीय सिसे लिमाने ही मॅरेथॉन 2 तास, 6 मिनिटे आणि 17 सेकंदाचा अवधी घेत जिंकली. लिमाने या मॅरेथॉनमध्ये विक्रमी जलद वेळेची नोंद केली. या स्पर्धेच्या 128 वर्षांच्या इतिहासामध्ये इथोपियाच्या लिमाने वेगवान जलद वेळ नोंदविणाऱ्या धावपटूंच्या यादीत 10 वे स्थान मिळविले आहे. पुरूषांच्या विभागात इथोपियाच्या मोहम्मद इसाने दुसरे स्थान तर यापूर्वी दोन वेळेला अजिंक्यपद मिळविणाऱ्या इव्हान चिबेटला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या विभागात केनियाच्या हेलन ओबिरीने पहिले स्थान पटकाविले. गेल्या वर्षी तिने ही स्पर्धा जिंकली होती. आणि आता तिने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत महिलांच्या विभागात आपले वर्चस्व राखले आहे. ओबिरीने गेल्या वर्षी न्यूयॉर्क मॅरेथॉन स्पर्धा जिंकली होती. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ओबिरीकडे संभाव्य सुवर्णपदक विजेती म्हणून पाहिले जाते. पुरूषांच्या व्हिलचेअर विभागात स्विसच्या मार्शेल हगने सलग सातव्यांदा या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. हगने 1 तास, 15 मिनिटे आणि 33 सेकंदाचा अवधी घेत नवा विक्रम केला. महिलांच्या व्हिलचेअर प्रकारात ब्रिटनच्या इडेन रेनबो कुपरने जेनेपद पटकाविले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;