शिवसेनेचे सज्यजित पाटील-सरूडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे सज्यजित पाटील-सरूडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी साधेपणात अर्ज दाखल केला.

दरम्यान, या मतदारसंघात महाविकास आघाडीचा संपर्क अत्यंत चांगला असल्याने येथे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सत्यजित पाटील-सरूडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार राजू आवळे, आमदार मानसिंग नाईक, माजी मंत्री शिवाजी नाईक, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते.

आज दुपारी सत्यजित पाटील-सरूडकर यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता मोजक्या लोकांसह दाखल होत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना आपल्याला शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. सर्वसामान्य जनता, सामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत. शक्तिप्रदर्शनाची गरज विरोधकांना आहे, म्हणून तर ते अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडीमधील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगले समन्वय असून, सध्या चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेटवर्क चांगले असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हातकणंगलेत चौरंगी लढत
हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी तसेच वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील असे उमेदवार आहेत. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;