‘टेस्ला’च्या 14 हजार कर्मचाऱयांवर संक्रांत

‘टेस्ला’च्या 14 हजार कर्मचाऱयांवर संक्रांत

एलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ कंपनी लवकरच मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे. ‘टेस्ला’ मध्ये 10 टक्के कर्मचाऱयांना म्हणजे सुमारे 14 हजार कर्मचाऱयांच्या कामावरून काढून टाकणार आहे. एलॉन मस्क यांनी कर्मचाऱयांना नोकरकपातीचे ई-मेल केले आहेत. ई-मेलमध्ये एलॉन मस्क यांनी म्हटलंय की, पंपनीला विकासाच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत असताना, खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पंपनीच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही जागतिक स्तरावर आमची संख्या 10 टक्केपेक्षा कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.

एलॉन मस्क हिंदुस्थानात येणार
एलॉन मस्क लवकरच हिंदुस्थान दौऱयावर येणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी एलॉन मस्क गुंतवणुकीची योजना जाहीर करू शकतात.

‘एक्स’वर रिप्लायसाठी पैसे मोजावे लागणार
एक्सवर पोस्ट लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी नवीन युजर्सना आता शुल्क भरावे लागतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी एका पोस्टला उत्तर देताना शुल्क आकारण्याबाबतचे संकेत दिले. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हलेय, ‘बॉट्सचा सतत हल्ला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि ती रक्कम नाममात्र असेल. मात्र, किती पैसे द्यावे लागणार हे अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही. पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, असा मस्क यांना विश्वास आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी जुन्या कर्मचाऱयांना कमी केले त्यानंतर ‘ट्विटर’चे नाव बदलून ‘एक्स’ केले. एवढेच नव्हे तर खात्यावरील ‘ब्लू टिक’साठी देखील सबस्क्रीप्शन ठेवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;