दिवसा नालेसफाई आणि रात्री लांबवायचे मोबाईल 

दिवसा नालेसफाई आणि रात्री लांबवायचे मोबाईल 

दिवसा नालेसफाई आणि रात्रीच्या वेळेस बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणाऱया विक्रम भोसले आणि बंटी सुरेंद्र भोसले या दोघांना कांदिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.   त्यांच्याकडून 30 मोबाईल जप्त केले. दोघांच्या अटकेने सहा गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कांदिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक पाटील, नारायण खाडे, जायभाये, जोगलपुरे, नवलू, वैराळ, गवळी, म्हात्रे, राणे आदींचे पथक नुकतेच गस्त करत होते. गस्तीदरम्यान महावीर नगर येथे विक्रम आणि बंटी हे दोघे संशयास्पद फिरताना दिसले. त्या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली तेव्हा त्या बॅगेत 30 चोरीचे मोबाईल आढळले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;