मुंबईवर वॉच ठेवण्यासाठी आणखी पाचशे सीसीटीव्ही बसवणार
आपत्कालीन स्थितीवर नजर ठेवण्यासाठी मुंबईभरात तब्बल बारा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आता पालिकेच्या पुढाकाराने आणखी पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱयांचे प्रक्षेपण पालिकेच्या विभागीय कार्यालयातील आपत्कालीन विभागात देण्यात येणार आहे. यासाठी पालिका सुमारे आठ कोटी 86 हजार रुपये खर्च करणार आहे. पावसाळय़ात मुंबईत पाणी तुंबून कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास या सीसीटीव्हीची मदत होणार आहे. याशिवाय वाहतूककोंडी, कोणतीही आपत्कालीन स्थिती, दुर्घटना अशा स्थितीमध्ये माहिती मिळावी आणि उपाययोजना करता याव्यात यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List