‘माझे नाव अरविंद केजरीवाल आणि मी दहशतवादी नाही’
‘माझे नाव अरविंद केजरीवाल आणि मी दहशतवादी नाही’ असा संदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील आणि दिल्लीतील जनतेसाठी तिहार तुरुंगातून पाठवला आहे. यावरून ‘आप’चे नेते, खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकार आणि भाजपावर तोफ डागली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केजरीवाल यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.
एका मुख्यमंत्र्याला एखाद्या दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जाते. त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या पत्नीला भेटताना काचेच्या भिंतीच्या माध्यमातून त्यांची भेट घडवली जाते. पंजाबचे मुख्यमंत्री ज्यांना झेड प्लस सुरक्षा आहे त्यांना भेटतानाही मध्ये काचेची भिंत होती. अशा प्रकारे वागणूक देऊन मोदी सरकारने हे सिद्ध केले आहे की, त्यांच्या मनात केजरीवाल यांच्याबद्दल द्वेषाची आणि बदल्याची भावना आहे, असा घणाघातही संजय सिंह यांनी मोदी यांच्यावर केला.
सुनीता केजरीवाल गुजरातमध्ये करणार प्रचार
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल या गुजरातमध्ये आपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List