भाजप जिंकू दे, तुला उचलून नेतो! भाजप नेत्याची आदिवासी महिलेला धमकी

भाजप जिंकू दे, तुला उचलून नेतो! भाजप नेत्याची आदिवासी महिलेला धमकी

पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एका आदिवासी महिलेला स्थानिक भाजप नेत्याने अपहरणाची धमकी दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

या नेत्याचं नाव शिव शंकर दास असं आहे. सोमवारी रात्री पीडित महिला आपल्या दोन मुलांसह झोपली होती. तेव्हा हा नेता तिच्या घरात जबरदस्तीने घुसला आणि त्याने तिला धमकावलं. त्याने पीडितेच्या मानेवर धारदार सुरा ठेवला आणि तिला फरफटत घराबाहेर घेऊन आला. त्याने महिलेला धमकी दिली की जर या निवडणुकीत भाजप जिंकला तर तुला उचलून घेऊन जाईन, अशी धमकी त्याने दिली. त्यावेळी त्याने तिचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिच्या आरड्याओरड्याने शेजारी गोळा झाले आणि त्यामुळे तो तिथून फरार झाला.

पीडितेने त्याच्याविरुद्ध जंगीपारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून शिव शंकर दास याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने भाजपच्या आदिवासी विरोधी आणि महिला विरोधी धोरणावर टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;