अंबरनाथमध्ये शिवसेनेचा धुमधडाका! भाजप आमदाराच्या कुटुंबीयांकडून संजय राऊतांचं जल्लोषात स्वागत
अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गाव येथील गावदेवीच्या जीर्णोध्दार केलेल्या मंदिराचे लोकार्पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गावकऱ्यांनी संजय राऊत यांची नेवाळी ते गोरपे गावात फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढली व जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी भाजपचे कल्याण ग्रामीणचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कुटुंबीयांकडून संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List