भाजपच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा… वाचा काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी का केली अशी मागणी

भाजपच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा… वाचा काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी का केली अशी मागणी

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;