मोठी बातमी – छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 18 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. जवान व नक्षलवाद्यांमध्ये छोटेबेठीया जंगलात झालेल्या चकमकीत 18 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन जवान जखमी झाले आहेत.
#WATCH | “Bodies of 18 naxals recovered from encounter site in Chhotebethiya of Kanker. 3 jawans were injured in the operation. Search operation underway. This can be seen as one of the biggest anti-naxal operations in the area. The operation was launched after information of the… pic.twitter.com/7YeUxEzoq5
— ANI (@ANI) April 16, 2024
छोटेबाठीयाच्या जंगलात टॉपचे नक्षल शंकर, ललिता व राजू दिसून आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. अद्याप या भागात शोध मोहीम सुरू असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरिक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.
या चकमकीत टॉपचा नक्षलवादी शंकर राव हा देखील मारला गेल्याचे समोर आले आहे. शंकर राव याच्या डोक्यावर तब्बल 25 लाख रुपयांचे बक्षिस होते. घटनास्थळावरून चार एके 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
देशात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या सत्राचे मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. कांकेर जिल्ह्यात देखील याच दिवशी मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी काही घातपात घडू नये म्हणून राज्यातील अतिसंवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात देखील या जंगलात एक चकमक झाली होती. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका टॉपच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला होता. तर एक जवान शहीद झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List