अत्यंत अश्लील, असभ्य.. म्हणत ’12th फेल’मधल्या विकास दिव्यकिर्ती यांनी ‘ॲनिमल’ला झापलं

अत्यंत अश्लील, असभ्य.. म्हणत ’12th फेल’मधल्या विकास दिव्यकिर्ती यांनी ‘ॲनिमल’ला झापलं

शिक्षक आणि नागरी सेवक विकास दिव्यकिर्ती हे ’12th फेल’ या चित्रपटानंतर अधिक प्रकाशझोतात आले. त्यांच्या शिकवणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या विचारांनी तरुणाई विशेष प्रभावित आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटावर बरीच टीका केली. हा चित्रपट बनायलाच पाहिजे नव्हता, असं मत त्यांनी मांडलं. इतकंच नव्हे तर त्यांनी ‘ॲनिमल’ला ‘अश्लील आणि असभ्य’ म्हटलंय. “ॲनिमलसारखा चित्रपट आपल्या समाजाला दहा वर्षे मागे घेऊन जातो. असा चित्रपट बनायलाच पाहिजे नव्हता. तुम्ही पैसे कमावलात. तुमचा हिरो ॲनिमल म्हणजे प्राण्यासारखाच वागतो असं तुम्ही दाखवलंत. पण यात कुठेतरी सामाजिक मूल्यांचा विचार करायला पाहिजे होता. लोक फक्त आर्थिक फायद्यासाठीच काम करतायत का”, असा सवाल विकास यांनी केला.

निलेश मिश्रा यांच्या मुलाखतीत विकास यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या एका वादग्रस्त सीनवरही प्रतिक्रिया दिली. चित्रपटात तृप्तीने रणबीरच्या प्रेयसीची भूमिका साकारली. त्यात तो तिला त्याचे शूज चाटण्यास सांगतो. या सीनवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्याविषयी बोलताना विकास म्हणाले, “हा चित्रपट पाहिल्यानंतर, सरंजामशाही मानसिकतेचा आणि बालिश स्वभावाचा एखादा मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी त्याचे शूज चाटण्यास सांगितलं तर काय कराल? जर आपण इतका अश्लील आणि असभ्य चित्रपट बनवत असू तर ही अत्यंत निराशाजनक बाब आहे.”

विकास दिव्यकिर्ती हे आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ’12th फेल’ या चित्रपटात त्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाचीच भूमिका साकारली होती. विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना त्यांना चित्रपटाच्या लेखकांपैकी एक म्हणूनही श्रेय दिलंय. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांची कमाई केली होती.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईच केली नाही तर सोशल मीडियावरही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवरून सोशल मीडियावर विविध मतमतांतरे मांडली गेली. चित्रपटातील रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यातील केमिस्ट्रीने तर सर्वांचं लक्ष वेधलंच. पण त्याचसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या भूमिकेची एक वेगळीच क्रेझ पहायला मिळाली. ‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत तृप्तीने न्यूड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. याच सीन्समुळे ती प्रकाशझोतात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;