बच्चन कुटुंबाला आवडायची करिश्मा कपूर, अभिषेक देखील लोलोवर फिदा, 19 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

बच्चन कुटुंबाला आवडायची करिश्मा कपूर, अभिषेक देखील लोलोवर फिदा, 19 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड विश्वातील अनेक अशा लव्हस्टोरी आहेत, ज्या कधी पूर्ण झाल्या नाहीत. जेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता, तेव्हा चाहत्यांनी देखील त्यांना डोक्यावर घेतलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शिकलं नाही. असंच काही झालं आहे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत. करिश्मा – अभिषेक यांनी एकमेकांना जवळपास पाच वर्ष डेट केलं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण नातं लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तुटलं…

करिश्मा – अभिषेक आणि कुटुंबियांमध्ये काही मतभेद असल्यामुळे दोघांचं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण आजही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. सध्या सोशल मीडियावर करिश्मा – अभिषेक यांचा 19 वर्ष जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडीओमध्ये, करिश्मा – अभिषेक एका पार्टीमध्ये आल्याचं दिसत आहे. पार्टीमध्ये करिश्मा हिची बहीण करीना कपूर देखील दिसत आहे. एवढंच नाहीतर, अभिषेक याची बहीण श्वेता नंदा आणि करिश्मा यांच्यातील नातं देखील दिसून येतं आहे.

व्हिडीओमध्ये अभिषेक याचं करिश्मा हिच्यावर असलेलं प्रेम दिसून येत आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता हिचं लग्न 1997 मध्ये कपूर कुटुंबाची मुलगी रितू नंदा यांचा मुलगा निखिल यांच्यासोबत निश्चित झालं होतं. या नात्यामुळेच कपूर आणि बच्चन कुटुंब जवळ आले आणि याचदरम्यान अभिषेक आणि करिश्माचीही भेट झाली. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.

एवढंच नाहीतर, महानायक अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवशी करिश्मा – अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा करत बिग बी यांनी सर्वांना हैराण केलं होतं. लवकरच दोघांचं लग्न देखील होतं. पण करिश्मा कपूर हिची आई बबिता कपूर यांच्या काही अटींमुळे दोघांचं लग्न शकलं नाही.

अभिषेक याच्यासोबत असलेलं नातं तुटल्यानंतर, अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. करिश्मा कपूर ही संजय कपूर याची दुसरी पत्नी होती. दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर अभिनेत्री आता दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून करत आहे.

तर अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेता पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. ऐश्वर्या – अभिषेक यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. ऐश्वर्या – अभिषेक याची लेक असल्यामुळे आराध्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;