सुजय विखेंविरोधात भाजपमध्ये संताप, 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

सुजय विखेंविरोधात भाजपमध्ये संताप, 100 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

नगरमध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामा देण्यास सुरुवात केलेली आहे या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भाजपमध्ये आता उमेदवारी बदलली जाईल की काय अशी सुद्धा चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे.

भाजपमध्ये राजीनामा विषय आता चांगलाच गाजलेला आहे. सुजय विखे यांच्या बद्दलची नाराजी आता जाहीरपणे उभाळून आलेली आहे. या अगोदर माजी आमदार राम शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केलेले होते. मात्र पक्षाने सर्व काही विषय निकष बाजूला ठेवून सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये असंतोष निर्माण झालेला होत. त्याचा प्रत्यंतर आज दिसून आलेला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झालंय. नगरमध्ये भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. याच नाराजीतून शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. नगर जिल्ह्यातील शेवगावचे जवळपास 100 कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

स्थानिक पातळीवरील राजकारण, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा देण्यात आलेली लोकसभेची उमेदवारी राजीनाम्यामागील कारण असल्याची माहिती आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कळवली आहे. आज थोड्याच वेळात भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे नगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीकरीता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ 37 उमे‌द्वारी दिल्याने भाजपची नगरची दक्षिण जागा ही धोक्यात येवू शकते. खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठयाप्रमाणात तुटला आहे, असं भाजप नेते सुनील रासने यांनी म्हटलं आहे.

नागरीकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे. पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे, असे काम खासदार विखे यांनी केल्याचा आरोप रासने यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा पारही करेल. मात्र, नगर-दक्षिणची जागा नसणार याचे दुःख मतदार संघात प्रत्येक कार्यकत्याला वाटत आहे. त्यामुळे या उमेद्‌वारीच्या निषधार्थ मी माझ्या पक्षाने दिलेल्या पदांचा राजीनामा देत आहोत. पक्षाचा प्राथनिक सदस्य राहुन आम्ही निष्टावंत म्हणून भविष्यात पक्ष शुद्धिकरणासाठी काम करत राहणार आहोत, असंही रासने यांनी स्पष्ट केलंय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;