प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच मालिकेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव; स्पृहा-सागरची जोडी ठरणार हिट?

प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच मालिकेवर भरभरून प्रेमाचा वर्षाव; स्पृहा-सागरची जोडी ठरणार हिट?

कलर्स मराठी वाहिनी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करण्यासाठी सिद्ध झाली आहे. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ या मालिकेद्वारे दणदणीत झाली. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुख कळले’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने नुकत्याच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला अभिनेता भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले. आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जाणाऱ्या जोडप्याची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास, प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची ही गोष्ट आहे.

सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं असं नाही. तर ते त्यागातही असू शकतं. स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात आणि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे हे सांगणारी आणि त्यांच्या निखळ, निःस्वार्थी प्रेमाची ही कथा प्रेक्षकांना ‘सुख कळले’ मालिकेत पहायला मिळणार आहे. येत्या 22 एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

माधव- मिथिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं खूप कौतुक होत आहे. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच त्यांचं कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणं म्हणजे सुख नाही. कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपलं सुख असू शकतं. कधी दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असतं. तर कधी त्यागातही सुख असतं. माधव आणि मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी कथा म्हणजे ‘सुख कळले’. हीच निःस्वार्थी, निर्मळ प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीने याआधीच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या नवीन जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून प्रोमोवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा, त्यांच्या प्रेमाचा वर्षाव होतोय.

स्पृहा आणि सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्रातील आजचे आघाडीचे लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांची असून त्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर या मालिकेचे खंदे निर्माते आहेत. येत्या 22 एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;