माहीम येथील अपघातात दोघांचा मृत्यू

माहीम येथील अपघातात दोघांचा मृत्यू

माहीम येथे रविवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू, तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरुणाला केईएम इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

भावेश, निलेश आणि विकास हे तिघे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माहीमहून दादरच्या दिशेने दुचाकीवरून ट्रिपलसीट जात होते. दरम्यान, सेनापती बापट मार्गावरून जात असताना एका खासगी शाळेसमोर चालकाचे वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सुसाट दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भावेश (25) आणि निलेशचा (24) जागीच मृत्यू झाला, तर विकासची प्रकृती चिंताजनक आहे. निलेश दुचाकी चालवत होता व त्याने हेल्मेट घातले नव्हते असे समजते. घटनास्थळी दोन मोबाईल सापडले असून तेही अपघातामुळे फुटलेले होते. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;