रजनीकांत ते मणी रत्नम.. ऐश्वर्याच्या लग्नाला साऊथ सुपरस्टार्सची मांदियाळी
चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट्स आणि लार्जर दॅन लाइफ सीन्ससाठी दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर ओळखले जातात. आता त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठीही अशीच भव्यदिव्य तयारी केली आहे. चेन्नईमध्ये 15 एप्रिल रोजी ऐश्वर्या शंकरचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला.
या ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लग्नसोहळ्याची भव्यदिव्यता सहज पहायला मिळतेय. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याच्या लग्नाला साऊथ सुपरस्टार्सची खास मांदियाळी होती.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत रजनिकांतसुद्धा या लग्नाला उपस्थित होते. रजनीकांत यांनी शंकर यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाजी, एथीरान आणि 2.0 या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं.
अभिनेते कमल हासनसुद्धा ऐश्वर्याच्या लग्नाला उपस्थित होते. ते दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत 'इंडियन 2' या चित्रपटामध्ये काम करत आहेत. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही काही नामवंत कलाकार या शाही लग्नसोहळ्याला हजर होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List