पनवेलमध्ये भाडेतत्त्वावर घर, गॅलेक्सीची रेकी; सलमान खानच्या केसमध्ये मोठा खुलासा

पनवेलमध्ये भाडेतत्त्वावर घर, गॅलेक्सीची रेकी; सलमान खानच्या केसमध्ये मोठा खुलासा

अभिनेता सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करणारा विशाल ऊर्फ कालू धनक हा त्याच्या साथीदारासह महिनाभरापासून पनवेलमध्ये वास्तव्याला असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पनवेलमधील रहिवाशाकडून विकत घेतली असून याप्रकरणी दोघांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट पोर्तुगाल देशातून अपलोड करण्यात आल्याचं आयपी ॲड्रेसवरून दिसून येत आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. सलमानच्या घराजवळ करण्यात आलेल्या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या तपासात गोळीबार करणारे दोघंही एक महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आणि त्यांनी दुचाकी पनवेलच्या एका रहिवाशाकडून विकत घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी दुचाकी मालक आणि पनवेलमधील एजंटसह दोन जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात दुचाकी नेमक्या कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहेत, याबाबत आरोपींनी कोणतीही माहिती त्यांनी दिली नसल्याचं जबाबात म्हटलं आहे.

या गुन्ह्यांसाठी आरोपी विशालने महिनाभरापूर्वीच गुरुग्राम इथं सचिन नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. विशाल हा लॉरेन्स बिष्नोई गँगचा प्रमुख गुंड रोहित गोदाराचा विश्वासू मानला जातो. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाळा अधिक तपास करत आहे. दरम्यान पालघरमधून आरोपींनी लांब पल्ल्याची रेल्वे पकडली. आरोपी अवध एक्स्प्रेसमधून राज्याबाहेर गेले. रेल्वेच्या शेवटच्या स्टेशनवर आरोपी उतरले नसल्यामुळे त्यांनी गाड्या बदलल्याचा पोलिसांना संशय आहे.

चार दिवस सलमानच्या घराची रेकी

आरोपींनी गोळीबार करण्यापूर्वी चार दिवस सलमान खानच्या घराबाहेर रेकी केल्याचा संशय आहे. सीसीटीव्हीच्या तपासणीत आरोपी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून फिरत असल्याचं दिसून येत आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर लॉरेन्स बिष्नोईचा लहान भाऊ अनमोल बिष्नोईने सोशल मीडियावर पोस्ट लिहून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. ही पोस्ट पोर्तुगाल देशातून अपलोड करण्यात आल्याचं आयपी ॲड्रेसवरून दिसून आलं. पण आरोपींनी प्रत्यक्षात ही पोस्ट पोर्तुगालमधून केली अथवा तंत्रज्ञानाचा वापर करून तसं भासवण्यात आलं, याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;