लोकशाहीचे रक्षण करा! सुप्रिया सुळे यांना आजीबाईंचे साकडे

लोकशाहीचे रक्षण करा! सुप्रिया सुळे यांना आजीबाईंचे साकडे

Lok Sabha Election 2024: भारत वाचवा, लोकशाहीचे रक्षण करा, असे साकडे एका वयस्कर महिलेने खासदार सुप्रिया सुळे यांना घातले. याची व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचा भोर तालुक्यात गावभेट दौरा सुरू होता. आंबवडे येथील टिटेघर रस्त्याच्या चौकात एस. टी. बस थांबा शेडमध्ये काही वयस्कर महिला एसटी बसची प्रतीक्षा करीत होत्या. पान्हवळ गावातील भागुबाई विठ्ठल कोंढाळकर याही एसटीसाठी थांबल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘भारत वाचवा व लोकशाहीचे रक्षण करा’, असे साकडे सुप्रिया सुळे यांना घातले. सुप्रिया सुळे यांना कोंढाळकर यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;