राहुल नार्वेकर म्हणतात, मी गवळींच्या अ.भा. सेना परिवाराचा सदस्य, भायखळ्यातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

राहुल नार्वेकर म्हणतात, मी गवळींच्या अ.भा. सेना परिवाराचा सदस्य, भायखळ्यातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

Lok Sabha Election 2024: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या परिवारातील सदस्य झाले आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेचा पाठिंबाही मिळवला आहे. मात्र यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. 14 एप्रिल रोजी त्यांनी भायखळय़ातील हेरीटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या प्रचारसभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सभेतील त्यांचे भाषण समाज माध्यमावर फिरत आहे. या भाषणात त्यांनी ते म्हणतात की, ‘मी अखिल भारतीय सेनेच्या परिवाराशी जोडला गेलो आहे असे समजा’. ‘अ.भा. सेनेची साथ कधीही सोडणार नाही’.
‘डॅडींप्रमाणेच अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल’. अरुण गवळी यांनी मुंबईकरांवर उपकार केले आहेत. गरीबांचे पैवारी असे अशा शब्दात अरुण गवळीचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका गीत गवळी उपस्थित होत्या.

भाजपमध्ये संभ्रम

राहुल नार्वेकर यांच्या या भाषणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राहुल नार्वेकर यांनी अ. भा. सेनेचा पाठिंबा मिळवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;