धक्कादायक! पित्याने दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारले
किडनीचा आजार, त्याच्या उपचारावर होत असलेला खर्च या कारणातून पित्याने पोटच्या दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारल्याची धक्कादायक घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी बापाला बेडय़ा ठोकल्या आहेत.
इमरान अन्सारी (34) असे त्या आरोपी पित्याचे नाव असून तो मानखुर्द मंडाला परिसरातील राहणारा आहे. इरफानचा दीड वर्षाचा मुलगा अफान याला किडनीच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तो सारखा रडत असायचा. शिवाय त्याच्या उपचारावर खूप खर्च होत होता. शनिवारी सकाळी मुलगा रडू लागल्याने इरफानचे डोके फिरले आणि त्याने रागाच्या भरात मुलाला उचलून घराबाहेर जमिनीवर आपटले. यात जबर मार लागल्याने मुलगा बेशुद्ध झाला. त्याच्या आईच्या ही बाब लक्षात येताच तिने तत्काळ मुलाला परिसरातील एका खासगी इस्पितळात दाखल नेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List