अंजू, हर्षिता यांना रौप्यपदके

वृत्तसंस्था/ बिशेक (किर्गिजस्तान)

येथे झालेल्या वरिष्ठांच्या आशियाई महिलांच्या कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत रेल्वेच्या अंजूने तसेच हर्षिताने आपल्या वजन गटातून रौप्यपदके पटकाविली. मात्र सरिता मोरला या स्पर्धेतून विनापदक परतावे लागले आहे.

या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अंजूने महिलांच्या 53 किलो वजन गटात फिलिपिन्सच्या अलिया गॅव्हेलेज तसेच लंकेच्या निथमी फर्नांडोचा तांत्रिक गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीत तिला चीनच्या लेईकडून कडवा प्रतिकार मिळाला पण अंजूने ही लढत 9-6 अशा गुणांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीतील लढतीत कोरियाच्या जी हेयांग किमने अंजूचा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या 72 किलो वजन गटात भारताच्या हर्षिताला अंतिम लढतीत चीनच्या जियांगने 2-5 अशा गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक मिळविले. हर्षिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या सरिता मोरला मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मंगोलियाच्या इनेकबेथकडून हार पत्करावी लागल्याने तिला विनापदक मायदेशी परतावे लागत आहे. या स्पर्धेतमध्ये भारताच्या मनिषा बनवालने 62 किलो गटात, अंतिम कुंडूने 65 किलो गटात कांस्यपदके मिळविली. या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकूण 6 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 3 रौप्य आणि 3 कांस्पपदकांचा समावेश आहे. शनिवारी समाप्त झालेल्या पुरूषांच्या विभागात भारताच्या उदितने रौप्यपदक तर अभिमन्यू, विकी यांनी कांस्यपदके मिळविली. ग्रीको रोमन पद्धतीच्या लढतींना सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;