रवी किशन माझ्या मुलीचे वडील, उत्तर प्रदेशमधील महिलेचा गंभीर आरोप

रवी किशन माझ्या मुलीचे वडील, उत्तर प्रदेशमधील महिलेचा गंभीर आरोप

भाजप खासदार व अभिनेता रवि किशन अडचणीत आले आहेत. उत्तर प्रदेशमधील एका महिलेने रवी किशन यांच्यासोबत तिचे लग्न झाल्याचा दावा केला असून रवी किशन हे तिच्या मुलीचे वडील असल्याचे म्हटले आहे. अपर्णा ठाकूर असे त्या महिलेचे नाव असून तिने एक प्रेस कॉन्फरन्स घेत हे आरोप केले आहेत.

”1996 ला माझे रवी किशन यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांचे नातेवाई मित्रपरिवारासमोर त्यांनी मला मंगळसूत्र घातलं होतं. माझ्या भांगेत कुंकू भरलं होतं. आमची एक मुलगी देखील आहे. शेनोवा असे तिचे नाव असून आमच्या तिघांचे एकत्र फिरताना अनेक फोटो आहेत. रवी किशन हे समोर आले की शेनोवाला त्यांची मुलगी मानतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी त्यांनी तिला मुलगी मानले पाहिजे. तिला तिचा अधिकार मिळायला हवा. त्यासाठी मी न्यायालयातही जायला तयार आहे”, असे अपर्णा ठाकूर म्हणाल्या.

रवी किशन हे भोजपूरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलेले आहे. ते भाजपचे गोरखपूरचे खासदार असून आताही त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. रवी किशन यांचे लग्न प्रीती किशन यांच्यासोबत झालेले असून त्यांना एक मुलगी देखील आहे.

हा माझ्या विरोधातील कट

रवी किशन यांनी हा त्यांच्या विरोधातील कट असल्याचे म्हटले आहे. ”30 वर्षापूर्वी मी या महिलेच्या घरात भाड्याने राहायचो. आता मला ती महिला ब्लॅकमेल करत आहे. याआधीही मी या महिलेविरोधात मुंबईत तक्रार नोंदवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;