लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील पाच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील पाच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई

लोणी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशद निर्माण करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियामान्वये प्रवरानगर येथील पाच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अमर बाळू भोसले, अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले, ऋषिकेश उर्फ भैय्या बाबासाहेब सरोदे, आदित्य बाळासाहेब गायकवाड, मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल आल्हाट सर्व रा.प्रवरानगर, ता. राहाता अशी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नांवे आहेत. चालू वर्षात नगर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. लोणी पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट मध्ये म्हटले आहे की वरील चारही आरोपींवर संघटितपणे 19 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखप्तीसह चोरी, दंगा, घातक हत्यारांचा वापर करून परिसरात दहशद निर्माण केली होती.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर आरोपींनी परिसरात भय पसरविले होते. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यामध्ये बदल होत नसल्याने लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि कैलास वाघ व तपासी अधिकारी पीएसआय योगेश शिंदे, पीएसआय आशिष चौधरी यांनी सदर आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम प्रमाणे आरोपींवर वाढीव कलम लावण्यासाठी जिल्हा अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपुरचे अप्पर जिल्हा अधीक्षक वैभव कुलबरमे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने तसेच स्थनिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांचे आदेशानुसार पोहेकॉ असिर सय्यद, पोहेकॉ रवींद्र पांडे, पोहेकॉ राम माळी स्थनिक गुन्हे शाखा अ, नगर यांचे वतीने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी दिला होता.

नाशिकचे विशेष महानिरीक्षक (नासिक परिक्षेत्र ) यांच्या कार्यालयात हा प्रस्थाव सादर झाल्यानंतर त्यास वाढीव कलमे लावण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वरील पाच आरोपींविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;