सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 2 संशयित ताब्यात
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी नवी मुंबईतून या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
सलमानच्या गॅलेक्सी येथील घरावर रविवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले होते.
नवी मुंबईतून ज्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्यावर हल्लेखोरांचे स्थानिक मदतनीस असल्याचा आरोप आहे. त्यांनीच या हल्लेखोरांना रेकी करण्यासाठी मदत केली होती, असा संशय आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सलमान खान याला याआधीही धमक्या आल्या होत्या. या हल्ल्यानंतर त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List