तिचं स्वत:चं लग्न नर्कासमान..; लिव्ह-इन रिलेशनशिपचा सल्ला देणाऱ्या झीनत अमान यांच्यावर भडकल्या मुमताज

तिचं स्वत:चं लग्न नर्कासमान..; लिव्ह-इन रिलेशनशिपचा सल्ला देणाऱ्या झीनत अमान यांच्यावर भडकल्या मुमताज

दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबच सल्ला दिला होता. तरुणांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आणि मजबूत नातं तयार होण्यासाठी लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायला हवं, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती आणि त्यावर विविध प्रतिक्रियासुद्धा आल्या होत्या. आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने झीनत अमान यांच्या या सल्ल्याला थेट चुकीचं ठरवलं आहे. अभिनेत्री मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मत मांडलंय.

‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या, “मी झीनत यांच्याशी सहमत नाही. कितीही लिव्ह-इनमध्ये राहिलात तरी काय गॅरंटी आहे? अनेक महिने लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरही तुमचं लग्न यशस्वी होईल याची काय गॅरंटी आहे? मी तर म्हणते, लग्नच नको. दिवस आणि वयाच्या बंधनात स्वत:ला बांधण्याची काय गरज आहे? लग्न कशाला पाहिजे? मुलांसाठी का? अरे, मुलांसाठी बाहेर पडा, अशा व्यक्तीला शोधा तो तुमच्यासाठी बनला असेल. हे जग खूप पुढे निघून गेलंय. आपल्या मुलींना हा विश्वास दाखवून मोठं करा की त्यांचं अस्तित्व पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही. माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. लग्नाचं बंधन खूप जपावं लागतं. हे सोपं नसतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी भारतीय समाज अद्याप तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याविषयी मुमताज पुढे म्हणाल्या, “आपण काय सल्ला देतोय याची झीनत अमान यांनी काळजी घ्यायला हवी. त्यांना सोशल मीडियावर अचानक ही लोकप्रियता मिळाली आहे आणि कुल आंटी बनण्याची त्यांची ही उत्सुकता मी समजू शकते. पण आपल्या नितीमूल्यांच्या विरोधात जाऊन असा सल्ला देणं हा काही फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा उपाय नाही. मुलींनी जर लिव्ह-इनची संस्कृती अंगीकारायला सुरुवात केली तर एक संस्था म्हणून विवाह कालबाह्य होईल. मला प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न असं एका मुलीशी करून द्याल का, जी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. तुम्ही उदाहरण म्हणून झीनत यांच्याकडेच पाहा. त्या लग्नाच्या बऱ्याच वर्षांपूर्वी पती मजहर यांना ओळखत होत्या. पण त्यांचं स्वत:चं लग्न हे नर्कासमान होतं. खरंतर रिलेशनशिपबद्दल सल्ला देणाऱ्यांमध्ये त्या शेवटच्या व्यक्ती असायला हव्यात.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;