रिॲलिटी शोजची खरी रिॲलिटी; शिव ठाकरेनंतर मनिषा राणीकडून धक्कादायक खुलासा

रिॲलिटी शोजची खरी रिॲलिटी; शिव ठाकरेनंतर मनिषा राणीकडून धक्कादायक खुलासा

गेल्या काही वर्षांत रिॲलिटी शोजी क्रेझ तुफान वाढली. त्यापैकी ‘बिग बॉस’ हा अनेकांचा लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. ‘बिग बॉस 16’चा फायनलिस्ट आणि ‘बिग बॉस मराठी’चा विजेता शिव ठाकरे याने काही दिवसांपूर्वी बक्षिसाच्या रकमेबद्दल खुलासा केला होता. प्रत्यक्षातील बक्षिसाच्या रकमेपेक्षा खूप कमी रक्कम त्याला मिळाली होती. आता शिव ठाकरेनंतर ‘झलक दिखला जा 11’ची विजेती मनिषा राणीनेही तोच दावा केला आहे. अद्याप बक्षिसाचे 30 लाख रुपये मिळालेच नसल्याचं मनिषाने सांगितलंय. इतकंच नव्हे तर जेव्हा ही रक्कम दिली जाईल, तेव्हा निम्मीच मिळणार असल्याचा खुलासा मनिषाने केला आहे.

काय म्हणाला होता शिव ठाकरे?

“बिग बॉस मराठी 2’च्या विजेत्याला 25 लाख रुपये मिळाले अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी ट्विस्ट आणला. त्यामुळे फिनालेच्या काही तास आधी बक्षिसाची रक्कम आठ लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. यानंतर कॅश प्राइज 17 लाख रुपयांवर येऊन पोहोचलं होतं. त्या 17 लाख रुपयांमधूनही मला फक्त 11.5 लाख रुपयेच मिळाले होते. यातूनही काही पैसे कापले गेले होते. यामध्ये माझ्या कुटुंबीयांच्या विमान प्रवासाची तिकिटं आणि काही कपड्यांचा बिल्सचा समावेश होता,” असं शिव ठाकरेनं सांगितलं होतं.

मनिषा राणी ‘झलक दिखला जा’ या डान्स शोच्या अकराव्या सिझनची विजेती ठरली. नुकत्याच एका व्लॉगमध्ये ती म्हणाली, “मला अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. त्यातूनही ते निम्मी रक्कम कापून मला देतील. लोकांना असं वाटतंय की माझ्या आयुष्यात सध्या पैशांचा वर्षाव होतोय. पण हे फक्त त्या लोकांसोबत घडतं, त्यांचा करोडपती बॉयफ्रेंड असतो. माझ्याकडे ना करोडपती आहे ना बॉयफ्रेंड.”

मनिषा तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. ‘झलक दिखला जा 11’मध्ये मनिषाने खुलासा केला होता की तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर ती वडिलांच्या नकळत आईला भेटायला जाते. मनिषा लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनीच तीन मुलांचा सांभाळ केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;