दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीवर टीकेचा वर्षाव; अभिनेत्रीने सोडलं मौन

दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीवर टीकेचा वर्षाव; अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनेता अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रियामणीने मुस्तफा राजशी लग्न केलंय. ट्रोलिंगचा परिणाम तुझ्या खासगी आयुष्यावर झाला का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. “खरं सांगायचं झालं तर माझ्यावर किंवा माझ्या आईवडिलांवर त्याचा अजिबात परिणाम झाली नाही. माझा पती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला”, असं तिने सांगितलं.

“माझ्या पतीने मला आश्वासन दिलं होतं की, काहीही घडलं तरी ते सर्वांत आधी माझ्याकडे यावं याची काळजी मी घेईन. पण मी फक्त इतकंच सांगेन की प्रत्येक पावलावर तू माझा हात पकड आणि माझी साथ दे. आम्ही दोघं ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, तेव्हासुद्धा मला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मी त्याला तीच गोष्ट सांगितली होती की, माझ्यासोबत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. आम्ही एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचं पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे या वाटेत कोणतंही वादळ आलं तरी आम्ही त्याला एकत्र सामोरं जाणार होतो. मला इतका समजूतदार पार्टनर मिळाल्याने मी खूप खुश आहे. प्रत्येक समस्येवर कशी मात करायची, हे त्याला माहीत असतं”, असं प्रियामणीने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

याविषयी ती पुढे म्हणाली, “ट्रोलिंगबद्दल मला वाईट वाटलं होतं, पण त्यावेळी मी मुंबईत नव्हते. मी बेंगळुरूमध्ये माझ्या पतीसोबत होते. आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली होती आणि त्याचा परिणाम कुटुंबीयांवरही होऊ दिला नव्हता. कोणत्याही टीकेचा फारसा विचार करू नका, कारण अखेर आम्ही दोघं सोबत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे, असं त्यांना समजावलं होतं. त्यांचा आशीर्वाद आणि प्रार्थना आमच्यासोबत कायम आहेत.”

प्रियामणीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे. तिने यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ती लवकरच ‘द फॅमिली मॅन 3’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;