लोकल आणखी फास्ट होणार

लोकल आणखी फास्ट होणार

 

रडतखडत चालणाऱया लोकलमुळे प्रचंड हैराण व्हायला होते. एक तासाच्या प्रवासासाठी अनेकदा दुप्पट वेळ लागतो, पण आता ही कटकट संपणार आहे. कारण रेल्वेगाडय़ा तब्बल 110 ते 130 किमी ताशी वेगाने धावणार आहेत. तसेच रेल्वे ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने 1282 किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर सेफ्टी फेसिंग अर्थात सुरक्षा पुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे.  1282 पैकी 404 किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर सुरक्षा पुंपण उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

रेल्वे रूळांवर गुरांचेही मोठय़ा प्रमाणावर अपघात होतात. गुरांचा कळप रेल्वेला आडवा आल्यास मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होते. गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनला गुरे धडकण्याच्या घटनाही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ांचा वेग वाढण्यासाठी मध्य रेल्वेने तब्बल 4 हजार 226 किलोमीटर रेल्वेमार्गावर सुरक्षा पुंपण उभारण्याचे कामही हाती घेतले आहे.

n लोकलमधून किंवा रेल्वेतून पडून अपघात होऊ नयेत यासाठी रेल्वे रूळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रूळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे तसेच प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झालेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा पुंपण बांधून शून्य अपघाताचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;