उमेदवारीसाठी गद्दारांचे हेलपाटे; हेमंत गोडसे दहाव्यांदा एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सामील झालेल्या खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नाशिकचे मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाणे गाठले होते. गेल्या तीन आठवडय़ांतील त्यांची ही दहावी भेट आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेवरून मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधीही नाशिकच्या जागेवर टपून आहेत. मिंधे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून भेटीगाठी, शक्तिप्रदर्शने अशा मार्गांचा अवलंब केला आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आज दहाव्यांदा ते ठाणे येथे पोहोचले होते. उमेदवारी मिळेल अशा आशेवर गोडसे आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List