मुनगंटीवार नाखूश, नाराज, दिल्लीबद्दल उदासीन; शांत, संयत प्रतिभा धानोरकरांना मतदारांचा पाठिंबा

मुनगंटीवार नाखूश, नाराज, दिल्लीबद्दल उदासीन; शांत, संयत प्रतिभा धानोरकरांना मतदारांचा पाठिंबा

>>अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूर लोकसभेतून भाजपने मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली खरी. पण राज्यात बस्तान बसलेले आणि दिल्लीत जायला नाखूश, नाराज आणि उदासीन असलेले मुनगंटीवार प्रचारात तोंडाला येईल ते बोलून मोकळे होत आहेत, हात झटकून मोकळे होत आहेत. एकदा काय तो सोक्षमोक्ष लागू दे, असे ध्येय ठेवून नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे साच्यातले गोड गोड काwतुक करून मुनगंटीवार चेहरा हसरा ठेवत दुःख गिळून प्रचार करत आहेत. या सगळय़ा गोष्टी मतदारांच्या नजरेतूनही सुटल्या नाहीत. अशा वातावरणात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा शांतपणे सुरू असलेला प्रचार चंद्रपूरकरांच्या मनात घर करून आहे.

मला खासदारकीची जबाबदारी नको, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. सर्व प्रसारमाध्यमातून मुनगंटीवारांनी खरेखुरे, मनापासून केलेले विधान छापून आले. त्यानंतरही मुनगंटीवारांवर दयामाया न दाखवता भाजपने मुनगंटीवारांचे पार्सल दिल्लीला पोहोचवण्याचा निश्चय करत त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे नाइलाजाने मुनगंटीवार यांनी चंद्रपूरची उमेदवारी स्वीकारली आहे.

मुनगंटीवारांना प्रतिभाताईंची भीती का वाटतेय?

स्वतः नाराज, नाखूश आणि उदासीन मुनगंटीवारांना प्रतिभाताई धानोरकरांची भीती वाटू लागली आहे. महाराष्ट्रातून एकमेव निवडून आलेल्या काँग्रेस खासदार सुरेश धानोरकर यांच्या त्या पत्नी आहेत. सुरेश धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती त्यांना मिळू नये म्हणून मुनगंटीवार कोणाच्याही डोळय़ातील अश्रूंना भुलून मतदान करू नका, अशी विनंती दर प्रचारसभेत करत आहेत.  सुरेश धानोरकरांचे काम मुनगंटीवार यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे घाबरलेले मुनगंटीवार तोंडाला येईल त्या पद्धतीने प्रतिभाताईंवर टीका करत सुटले आहेत. हे कमी म्हणून की, काय सोबतीला प्रचारासाठी मोदी, फडणवीस, नेते आणि अभिनेतेही आणत आहेत.

प्रतिभताईंची प्रचारात आघाडी

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा देशातील जातीयवाद, धर्मांदता, असहिष्णुता यावर प्रहार करत अत्यंत चपखलपणे प्रचार सुरू आहे. त्यामुळे प्रचारसभांमध्ये त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. शांत, संयत आणि आततायीपणा न करता मुनगंटीप्रमाणे दिखाऊगिरी न करता त्यांचा प्रचार सुरू आहे

तोंडफाटय़ा स्वभाव की मुजोरी?

भाजपमध्ये सध्या तोंडफाटय़ा आणि मुजोर नेत्यांची मोठी चलती आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रचारातून आपला तोंडफाटय़ा स्वभाव वेळोवेळी दाखवून दिला. छाती काढून विधाने ठोकून द्यायची आणि नंतर जास्तच काही माध्यमातून टीका होऊ लागली की, माफीऐवजी दिलगिरी व्यक्त करतो म्हणून वेळ मारून नेण्याचा स्वभाव चंद्रपूरच्या प्रचारसभेतही दिसला. भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर असभ्य टीका करताना ते जरासुद्धा लाजले नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;