देवगडमध्ये ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांची 26 लाखांची फसवणूक; 7 जणांवर गुन्हा दाखल

देवगडमध्ये ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांची 26 लाखांची फसवणूक; 7 जणांवर गुन्हा दाखल

देवगडमध्ये इस्टोअर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या स्कीमद्वारे पैसे गुतंवण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे गुंतवणुकदारांची सुमारे 26 लाख 14 हजार 210 रूपयांची फसवणूक कंपनीकडून करण्यात आली. या प्रकरणी देवगड पोलिसांनी कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची ही घटना 17 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2022 या कालावधीत घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील फैजान खान, शमशाद अहमद, गुरुद अली खान आणि मुकेश तेली यांनी ई-स्टोअर मधील वेदिक आयुरकेअर प्रा.लि.नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीचे सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुख्य एजंट म्हणून देवीदास बाळकृष्ण खवळे,अनिल काशीराम जाधव, संजना परांजपे, शैलेंद्र बाबुराव पेडणेकर, रौनक पटेल, सचिन सावंत, किरण कदम या एजंटद्वारे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध भागात तसेच देवगड येथील बँक ऑफ इंडिया देवगड शाखेच्या एका गाळ्यामध्ये मुख्य एजंट देवीदास परब यांनी ई स्टोअरमधील वेदिका आयुर केअर नावाचे कंपनीचे कार्यालय उघडून गुंतवणुकदारांना वेदिका कंपनीची ग्रोसरी, हेल्थ फॅमिली पॅकेज, वेदा पॉईट, वेदा माल्ट, मल्टीपल फॅमिली पॅकेज या नावाच्या पॅकेजवर भरघोस परतावा व फायदा असल्याचे सांगितले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन त्याकरीता वेगवेगळ्या स्कीमद्वारे रोख रक्कम तसेच बॅकींगद्वारे गुंतवणुकदारांकडून पैसे उकळले. एकूण 54 गुंतवणुकदारांना कंपनीचा आयडी नंबर देत कोणताही परतावा दिला नाही. अशा प्रकारे गुंतवणुकदारांची 26 लाख 14 हजार 210 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार तारामुंबरी येथील चैतन्या चेतन तारकर यांनी दिली आहे.

या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी कंपनीचे मुख्य संचालक फैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली (रा.दिल्ली) यांच्यासह मुख्य एजंट अनिल काशीराम जाधव, संजना परांजपे, शैलेंद्र बाबुराव पेडणेकर, रौनक पटेल, सचिन सावंत, किरण कदम, देवीदास बाळकृष्ण खवळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;