न्यूझीलंडची भारतावर मात

वृत्तसंस्था/ चेंगशा (चीन)

बिली जिन किंग चषक सांघिक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी झालेल्या लढतीमध्ये न्यूझीलंडने भारताचा 2-1 अशा फरकाने पराभव केल्याने या स्पर्धेत भारताने प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याची ऐतिहासिक संधी गमावली.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील झालेल्या या लढतीमध्ये भारताच्या अंकिता रैनाला महत्वाचा दुसरा एकेरी सामना जिंकता आला नाही. तर प्रार्थना ठोंबरे समवेत दुहेरीच्या सामन्यातही भारताला हार पत्करावी लागली. या पराभवामुळे भारतीय संघाला आशिया ओसेनिया गट एकमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या ऋतुजा भोसलेने पहिल्या एकेरी सामन्यात न्यूझीलंडच्या बॅरीचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात न्यूझीलंडच्या सनने अंकिता रैनाचा 6-2, 6-0 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या होरीगेन आणि रुटलिफ यांनी भारताच्या अंकिता रैना व ठोंबरे यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला. या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. 6 संघांचा सहभाग असलेल्या गट एकमध्ये भारताला तिसरे स्थान मिळाले. पुढील वर्षी या स्पर्धेत भारतीय संघाला पुन्हा गट एकमधूनच खेळावे लागेल.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;