राधिकाला रौप्य तर शिवानीला कांस्य

 वृत्तसंस्था / बिश्केक (किर्गिजस्तान)

येथे सुरु असलेल्या वरिष्ठांच्या आशियाई महिलांच्या कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने रौप्यपदक पटकाविले तर शिवानी पवारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे अन्य वजन गटात अंजू आणि हर्षिता यांनी अंतिम फेरी गाठली. तसेच सरिता मोरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

गेल्या वर्षी झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत राधिकाने रौप्यपदक पटकाविले होते तसेच 2022 च्या वरिष्ठांच्या आशियाई महिलांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दुसरे स्थान मिळविले होते. राधिकाला अंतिम लढतीत जपानच्या नोनोका ओझाकीने तांत्रिक गुणावर पराभूत करत सुवर्णपदक हस्तगत केले. महिलांच्या 50 किलो वजन गटात फेंगने शिवानीचा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव केला. पण शिवानीने कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या डोल्गोजेरेव्हचा 9-7 असा पराभव केला. भारताच्या तमन्नाला पात्र फेरीच्या लढतीत जपानच्या कियोकाने 0-9 असे पराभूत केले. 59 किलो वजन गटात कांस्यपदकाच्या लढतीत कझाकस्तानच्या केयुमोव्हाने भारताच्या पुष्पा यादवचा 11-8 असा पराभव केला. कझाकस्तानच्या इलमिराने कांस्यपदकासाठीच्या लढतीत महिलांच्या 76 किलो वजन गटात भारताच्या प्रियाचा पराभव केला.

या स्पर्धेमध्ये भारताची महिला मल्ल तसेच रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करणारी अंजू आणि हर्षिता यांनी आपल्या वजनगटातून अंतिम फेरी गाठली आहे. अलिकडे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत अंजूने विनेश फोगटला पराभूत केले होते. भारताच्या सरीता मोरला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिलांच्या 53 किलो वजन गटात अंजूने उपांत्य लढतीत चीनच्या चून लेईचा 9-6 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंजूचा सुवर्णपदकासाठीचा सामना कोरियाच्या किमशी होणार आहे. अन्य एका लढतीत भारताच्या हर्षिताने उझबेकच्या झेरिपबोएव्हाचा पहिल्या फेरीत 13-3 तर त्यानंतर पुढील फेरीत तिने कझाकस्तानच्या पॅनेसेव्हीचचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. सुवर्णपदकासाठी हर्षिता आणि चीनची झियांग यांच्यात लढत होईल. 62 किलो गटात मनिषा बनवाल आणि 65 किलो गटात अंतिम कुंडू हे भारतीय मल्ल कांस्यपदकासाठी लढत देतील.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;