खुनातील आरोपीच्या दुचाकीवर बसून सुजय विखे रॅलीत दाखल
नारायणगव्हाण येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुह्यातील आरोपी अजिंक्यतारा दरेकर याच्या दुचाकीवर बसून खासदार डॉ. सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकारणी लोकांचे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाला काहीच अर्थ राहिला नसल्याचे सांगत ‘बाबासाहेब तुम्ही परत या, मला न्याय मिळवून द्या,’ अशी आर्त हाक मृत संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिली.
‘माझ्या पतीचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. पतीची हत्या झाल्यानंतर आमच्यापुढे मोठे संकट उभे असतानाच पतीच्या मारेकऱयांपासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. या आरोपींना तडीपार करण्यात यावे. त्यांना मदत करणाऱया पुढाऱयांनाही तडीपार करावे. राहुल शिंदे-पाटील हे या आरोपींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करीत आहेत. शिंदे-पाटलांचीही चौकशी करून कारवाई करावी,’ अशी मागणी सुरेखा यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List