निवडणूक रोखे प्रकरणातील मेघा इंजिनीअरिंग कंपनीवर गुन्हा; 78 लाख रुपयांची लाच दिल्याचा सीबीआयचा आरोप

निवडणूक रोखे प्रकरणातील मेघा इंजिनीअरिंग कंपनीवर गुन्हा; 78 लाख रुपयांची लाच दिल्याचा सीबीआयचा आरोप

सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदीदारांमधील दुसऱया क्रमांकाची कंपनी मेघा इंजिनीअरिंगवर सीबीआयने एका लाच प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील या पंपनीने तब्बल 966 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. मुंबईसह देशात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पंत्राटे या पंपनीला देण्यात आली आहेत.

 

आठ अधिकाऱयांची एफआयआरमध्ये नावे

यासंदर्भात 31 मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या गुह्यानुसार, मेघा इंजिनीअरिंगचे प्रकल्प विभागाचे संचालक सुभाष चंद्रा यांनी एनआयएसपीचे माजी कार्यकारी संचालक प्रशांत डॅश यांना लाच म्हणून मोठी रक्कम दिली, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. उत्पादन विभागाचे संचालक डी. के. मोहंती, डीजीएम पी. के. भुयान, डीएम नरेश बाबू, वरिष्ठ व्यवस्थापक सुब्रो बॅनर्जी, निवृत्त सीजीएम एल, कृष्ण मोहन, जीएम के. राजशेखर, व्यवस्थापक सोमनाथ घोष यांनी 73 लाख 85 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे, असाही उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

174 कोटींची बिले मिळवण्यासाठी 78 लाख रुपयांची लाच

या पंपनीसोबतच सीबीआयने, एनआयएसपी, एनएमडीसी आणि मिकॉनमधील दोन पदाधिकाऱयांवरही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. जगदलपूर स्टील प्लांटशी संबंधित 174 कोटींची बिले मंजूर करण्यासाठी 78 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप या अधिकाऱयांवर ठेवण्यात आला आहे. जगदलपूरमध्ये सुमारे 315 कोटी रुपयांचा स्टील प्लांट उभारण्यात आला असून त्यात कथितरीत्या गैरव्यवहार झाल्याचा दावा एनएमडीसी लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकाऱयांनी केला होता. यानुसार त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सीबीआयने 10 ऑगस्ट 2023 रोजीच प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;