लोकशाहीच्या शुभविवाहाला तरुणांनो उपस्थित राहा! चंद्रपूरच्या कलाशिक्षकाने तयार केली कल्पक लग्नपत्रिका

लोकशाहीच्या शुभविवाहाला तरुणांनो उपस्थित राहा! चंद्रपूरच्या कलाशिक्षकाने तयार केली कल्पक लग्नपत्रिका

चंद्रपूरच्या एका चित्रकला शिक्षकाने निवडणुकीत 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवा वर्गाने येत्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाला हजेरी लावावी यासाठी लोकशाहीच्या विवाहाची कल्पना पोस्टकार्डवर मोठय़ा कल्पक पद्धतीने मांडली आहे. ‘वरात वाजत गाजत दारापर्यंत आली आहे. तुम्ही फक्त लोकशाहीच्या शुभविवाहाला उपस्थित राहून मतदान करा,’ असे आवाहन करणारी अनोखी लग्नपत्रिका शिक्षकाने तयार केली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जुन्याजाणत्या मतदारांसह नव्या दमाच्या युवा वर्गाने पुढाकार घ्यावा म्हणून सरकार जनजागृतीसह विविध उपक्रम राबवत आहे. मात्र वैयक्तिक पातळीवर आनंदवन येथील अंध विद्यालयाचे कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी चक्क 50 पैशाच्या पोस्टकार्डवर ‘लोकशाहीचा शुभविवाह’ ही अनोखी निमंत्रण पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून मतदारांना आवाहन केले आहे. ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली, अशांना मतदान करण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी या पत्रिकेद्वारे दिले आहे. पोस्टकार्डावर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनचा वापर करीत त्यांनी ही पत्रिका तयार केली आहे.

लग्नपत्रिकेत काय संदेश आहे

18 वर्षांवरील विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि युवकांनी आपल्या पालकांना प्रिय आईबाबामाझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा, असा संदेश दिला आहे. पोस्टकार्डच्या दुसऱया बाजूला मतदानावेळी लागणारी दहा ओळखपत्रांची माहिती लग्नपत्रिकेत देण्यात आली.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;