जनतेच्या प्रश्नांपासून मोदी दुरावले आहेत; प्रियंका गांधी यांचे जोरदार टीकास्त्र

जनतेच्या प्रश्नांपासून मोदी दुरावले आहेत; प्रियंका गांधी यांचे जोरदार टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोक आणि त्यांच्या प्रश्नांपासून पूर्णपणे दुरावले असून, देशातील महागाई आणि बेरोजगारीसाठी तेच जबाबदार आहेत, असा आरोप आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी येथे केला. मोदींना घाबरणारी त्यांच्याभोवतीची लोपंही हे वास्तव मोदींना सांगण्यास घाबरतात, असा दावा त्यांनी केला.

जेव्हा सत्ता एकवटलेली असते तेव्हा लोपंही सत्य सांगायला कचरतात. त्यांचे अधिकारी आणि सहकारीही त्यांना वास्तव सांगायला घाबरतात असे प्रियंका यांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि जालोरमधील काँग्रेसचे उमेदवार वैभव गेहलोत यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत सांगितले.

मोदींकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रकार

देशात सध्या विचित्र वातावरण आहे आणि लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अनेक प्रकार घडत आहेत. कधी आपले पंतप्रधान खोटे शौयदाखवतात, कधी त्यांना बढाई मारावी लागते, ते कधी मांस आणि माशांबद्दल बोलतात, कधी हवेत उडतात तर कधी समुद्राखाली जातात. या गोष्टींना तुमच्या आयुष्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न प्रियंका यांनी विचारला. महागाई, शेतकऱयांचे कर्ज हे आपले खरे प्रश्न आहेत, पण मोदीजी ते समजू शकत नाहीत. टीव्ही, मीडिया आणि पह्नवर देश पुढे चालला आहे असे दाखवले जाते. प्रगती होत आहे. सगळे सुखी आहेत असे सांगितले जाते. पण हे वास्तव आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;