धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली, राष्ट्रवादीकडून माढय़ातून लढणार

धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली, राष्ट्रवादीकडून माढय़ातून लढणार

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. अकलूजमधील एका कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना जयंत पाटील आणि धैर्यशील मोहिते यांनी भाजपसह विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. धैर्यशील मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी पक्की झाली आहे. धैर्यशील मोहिते मंगळवारी (दि. 16) उमेदवारी अर्ज दाखल करतील. माढय़ात धैर्यशील मोहिते-पाटील विरुद्ध रणजीतसिंह निंबाळकर अशी सरळ लढत होणार आहे.

धैर्यशील मोहिते यांनी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मी कार्यकर्त्यांना विचारूनच निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेला सर्व कार्यक्रम आपण राबवला. काहीजण मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलेत की, 70 वर्षात जी विकासकामे झाली नाहीत. तेवढी कामे पाच वर्षांत केली आहेत, असा दावा करत आहेत. मात्र, ते पूर्णपणे खोटे असून, मतदारसंघात त्यांच्याविषयी सर्वत्र नाराजी आहे.

मी खासदारकीसाठी इच्छुक होतो. त्यासाठी मी मतदारसंघात फिरलो. दुसऱयाला उमेदवारी जाहीर झाली. पण, माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला बोलण्याची इच्छा व्यक्त केली. लोकांनी मला त्यांच्या वेदना सांगितल्या. त्यामुळे मी ठरवलं की माझ्यासाठी नाही तर जनतेसाठी निवडणूक लढवायची, असे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

बीडचे पार्सल परत पाठवू

विजयदादांच्या सांगण्यावरून त्यांना एका रात्रीत माळशिरसचे आमदार केले. आता ते सर्वांनाच बोलत सुटले आहेत. नको ते बोलत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बीडचे हे पार्सल परत पाठवून देऊ, असा हल्लाबोल धैर्यशील मोहिते यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;