त्यामुळे त्यांना रात्रीचा एक पेग… भाजप नेत्याचे महिला मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

त्यामुळे त्यांना रात्रीचा एक पेग… भाजप नेत्याचे महिला मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

देशभरात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. सर्वत्र प्रचारसभा सुरू आहेत. यात सध्या देशात भाजपविरोधी वातावरण असल्यामुळे भाजप नेत्यांकडून कमरेखालची टीका केली जात आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसबाबत केलेली आक्षेपार्ह टीका ताजी असतानाच आता कर्नाटकातील एका भाजप नेत्याने महिला मंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

बेळगाव ग्रामीणचे भाजपा पक्षाचे माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान आमदार आणि कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. शनिवारी एका प्रचार सभेत बोलताना हेब्बाळकर यांच्याबाबत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

”बेळगाव येथील महिला भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यात माजी मंत्री रमेश जारकीहोळी भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धक्का बसला असून त्यांची रात्रीची झोपही उडाली आहे. त्यामुळे रात्री झोपण्यासाठी त्यांना एक पेग जास्तीचा घ्यावा लागत असेल’, अशी टीका संजय पाटील यांनी केली.

यावर उत्तर देताना हेब्बाळकर यांनी संजय पाटील व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ”संजय पाटील यांनी फक्त माझाच नाही तर राज्यातील स,र्व महिलांचा अपमान केला आहे. भाजपमध्ये महिलांबद्दल कसा दृष्टीकोन आहे ते यातून दिसून येते. भाजपचे नेते राम नामाचा जप करतात. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात काय सुरू असते ते संजय पाटील यांच्या ओठावर आले आहे, असे हेब्बाळकर म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;