रामनवमी निमित्त चार दिवस साईबाबा मंदीर परिसर ‘ नो पॉर्किंग झोन’

रामनवमी निमित्त चार दिवस साईबाबा मंदीर परिसर ‘ नो पॉर्किंग झोन’

शिर्डी येथे श्री साईबाबा मंदीरात होणाऱ्या रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने वाहनांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी श्री.साईबाबा मंदीर परिसर ‘नो पॉकिंग झोन (वाहन विरहित क्षेत्र)’ जाहीर करण्यात आला आहे. मंदीराकडे जाणाऱ्या पाच मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 16 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपासून ते 18 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असून श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, परराज्य व बाहेरील देशातून भाविकांची व त्यांच्या वाहनांची प्रचंड गदी होत असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी रामनवमी उत्सव 2024 साठी मोठ्या प्रमाणात भाविक श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. अहमदनगर – मनमाड हा महामार्ग शिर्डी शहरातून जात असल्याने गर्दीच्या कालावधीत भाविकांची व जनतेची गैरसोय होवू नये तसेच भाविकांची सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने श्री. साईबाबा मंदिर परिसरात वाहन विरहीत क्षेत्र (नो पार्कंग झोन) घोषित करण्यात आला आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी आदेशात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;