बिश्नोई गँगने स्वीकारली सलमानच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी, पुन्हा दिली ही धमकी
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी गॅलेक्सी अपार्टमेंटवर सहा गोळ्या झाडल्या. पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. दरम्यान अनमोल बिश्नोईच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत असून त्यातून या हल्ल्याची जबादारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.
”आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर आहे’ असे या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. ”सलमान खान तुला आमची ताकद दाखवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. हा अखेरचा इशारा आहे. यानंतर घऱावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. ज्या दाऊद आणि छोटा शकीलला तु देव मानतोस. त्या नावाचे दोन कुत्रे आम्ही पाळले आहेत. जास्त काही बोलण्याची गरज नाही. जय श्री राम, अशी पोस्टे अनमोल बिश्नोईने शेअर केली आहे. दुपारच्या सुमारास अपलोड झालेली ही पोस्ट लगेच व्हायरल झाली.
बिश्नोई गँगने याआधीही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गँगचा मोहरक्या लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्सचा भाऊ असून त्याच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List