सलमान खान याने फक्त ‘हा’ एक शब्द बोलावा, सर्व वादच मिटून जाईल

सलमान खान याने फक्त ‘हा’ एक शब्द बोलावा, सर्व वादच मिटून जाईल

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती जेव्हा समोर आली, तेव्हा पासून सर्वत्र खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सांगायचं झालं तर, सलमान खानने ज्या बाल्कनीत उभं राहून ईदच्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या त्या बाल्कनीवरही गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. यावरून सलमान खानला टार्गेट करून त्याच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झालं आहे.

लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद आहेत. लॉरेन्स बिश्नोई यानेच सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्याची चर्चा रंगली आहे. तर दोघांमध्ये नक्की काय वाद आहेत आणि सलमान खान याच्या कोणत्या शब्दामुळे सर्व वाद मिटतील… याबद्दल जाणून घेऊ.

‘हम साथ साथ है’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना सलमान खान याच्याकडून काळवीटाची शिकार झाली होती. म्हणून, भाईजानला लॉरेन्स बिश्नोई याने हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवलं आहे. त्याचं कारणही त्याने सांगितले. 1998 मध्ये सलमान खान यानं काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमान खानवर नाराज होता. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे.

याप्रकरणावर लॉरेन्स बिश्नोई याने स्वतःचं मत देखील व्यक्त होतं. सलमान याने काळवीटाची शिकार केल्यामुळे बिश्नोई समाज त्याच्यावर नाराज आहे. जर सलमान खान मंदिरात येऊन तेथील लोकांची माफी मागणार असेल तर, अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्या बंद होतील. पण अभिनेत्याने माफी मागितली नाहीतर, त्याचे परिणाम वाईट असतील… असं देखील लॉरेन्स बिश्नोई म्हणाला आहे.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या दबंग खान याच्याकडे व्हाय प्लस सुरक्षा आहे. पण आता पुन्हा अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत सलमान खान याला गोळीबाराच्या धमक्या येत आहेत.

गेल्या वर्षी सलमान खान याच्या ऑफिसमध्ये धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. या ईमेल प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्यावर तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;