अमेरिकेनंतर कॅनडा; हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे मृत्युसत्र थांबेना, 24 वर्षीय चिरागचा मृतदेह कारमध्ये सापडला

अमेरिकेनंतर कॅनडा; हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे मृत्युसत्र थांबेना, 24 वर्षीय चिरागचा मृतदेह कारमध्ये सापडला

विदेशामध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे सत्र थांबण्याचे नाव नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता कॅनडामध्येही हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हरियाणातून कॅनडामध्ये शिकायला गेलेल्या चिराग अंतिल या 24 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह कारमध्ये आढळला आहे. 12 एप्रिल रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळतेय.

कॅनडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग अंतिल याचा मृतदेह ऑडी कारमध्ये सापडला आहे. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्यांना गोळीबाराचाही आवाज आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिरागची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे.

चिराग अंतिल हा हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी होता. 2002 मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी तो कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया भागात असणाऱ्या व्हँकुव्हर येथे गेला होता. शिक्षणासोबत तो कामही करत होता. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे.

दरम्यान, चिरागच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना साकडे घातले आहे. ही घटना घडली त्याच दिवशी सकाळी चिराग आणि त्याचा भाऊ रोहित यांचा फोनवर संवादही झाला होता. मात्र त्यानंतर त्याच्या मृत्युचीच बातमी आली. आम्ही कॅनडाच्या पोलिसांशीही चर्चा केली, मात्र ही घटना कशी घडली याची माहिती त्यांनी दिलेली नाही, असे चिरागचा भाऊ रोहित म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;